महिला मंडल अधिका-याला २० हजारांची लाच घेताना एसीबीने केली अटक

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या महिला मंडल अधिका-याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पुणे एसबीच्या पथकाने ही कारवाई मावळ तालुक्यातील आढले
बुद्रुक तलाठी कार्यालयात आज मंगळवारी केली.मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर वय ५४ आणि एजेंट संभाजी लोहोर असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत ४८ वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे २ नोव्हेंबर रोजी तक्रार केली आहे.एसीबी पथकाने पडताळणी केली असता, संगीता शेरकर यांनी सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करण्यासाठी २० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी आढले बुद्रुक तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला.

तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले.आरोपींवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.ही कारवाई पुणे लाचलुच पत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शना खाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here