पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा सुरू होतात मटका, पंती पाकोळी, अंदर बाहर बिंगो चे धंद्ये.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना उत आला असतानाही वरिष्ठ अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार, मटका, पंती पाकोळी, अंदर बाहर, बिंगो, काला लाल असे अवैध धंद्यांना परवानगी देऊन मलाई चाखली जात आहे. खालपासून वर पर्यंत सर्वांचीच मिलीभगत असल्याने कारवाई करण्यास मात्र कोणीच पुढे येताना दिसत नाही.
अवैध धंदे संदर्भात काही सामाजिक कार्यकर्ते यांनी कंट्रोल रूम ला कॉल दिल्यास पोलिस येण्यापूर्वीच अवैध धंदेवाले शटर टाकून काही मिनिटांसाठी धुम ठोकतात, रेट घालायला आलेले पोलिस रिकाम्या हाती निघून गेल्यावर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती दिसून येत आहे.पुन्हा धंदे जोमाने सुरू होतात. या अवैध धंदेवाल्यांमध्ये जास्त करून गुन्हेगारी स्वरूपाचेच गुन्हेगार आसरा घेतले आहे.
धंद्यांची तक्रार केल्यानंतर व पोलिस पोचण्या पूर्वी दुकानाचा शटर बंद का होतो? याची माहिती पुणे सिटी टाईम्सने घेतली आहे.
दत्त मंदिराचे डाव्या बाजू पासून ते क्रांती हॉटेल पर्यंत एकुण १५ धंदे तर १) बटाले रोड मंगळवार पेठ, मनोरमा केंद्राजवळ, देवी मंदिर जवळ.२) क्रांती हॉटेल जवळ, लेन नंबर २ बुधवार पेठ,३) १२७८ कसबा पेठ कुंभार वाडा पुण्यश्रेवर मंदिर शेजारी,४) लक्ष्मी रोड, सिटी पोस्ट श्रीकृष्ण सिनेमा गृह बिल्डिंग जवळ, ५) ढमढेरे गल्ली, श्रीकृष्ण टाकीज जवळ, अशा अनेक ठिकाणी धंदे जोमाने चालू असल्याचे व्हिडिओ पुरावा मिळाला आहे.
पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार हे रूजू झाल्या-झाल्या अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु कसले आदेश असे कितीही आदेश आले तरी आम्ही त्याला खतपाणी घालत नाही? असे वसुली बहाद्दारांनी दाखवून दिले आहे.
” वसुली बहाद्दूरांची वसुलीसाठी मोठी फिल्डींग “
फरासखाना पोलिस ठाण्याची वसुली म्हणटले की सोने पे सुहागा, तेथे वसुली करण्यासाठी चढाओढ लागलेली असते. ज्याची बोली-रक्कम मोठी त्याला वसुलीचा पद दिला जातो. सदरील वसुलीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दारे देखील ठोठावली जातात आणि लोटांगण घालून आपल्याकडे कशी वसुली येईल यासाठी दिवसरात्र कष्ट घेतात. आणि वसुली भेटली की मग चक्रे गरागर फिरवून मटका, पंती पाकोळी, काला लाल, अंदर बाहर, बिंगो, व्हिडिओ गेम धंदे वाल्यांकडून महिन्याला लाखो रूपयांची उलाढाल केली जाते.