पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी .
पुणे शहरात वाहतूक पोलिस चिरीमिरी घेत असल्याचा कित्येकदा आपण ऐकतच असतो परंतु एका जागरूक तरूणीने पुण्यातील वाहतूक पोलिसांचा थेट पोलखोलच केला आहे. भाग्यश्री साळुंखे नावाची तरूणी कोथरूड येथील नळस्टॉप येथून जात असताना, रस्त्यावर साज शोधणारे वाहतूक पोलिसांनी तीला अडवून त्याची जीजे नंबर प्लेट पाहून उलटसुलट प्रश्न विचारल्यानंतर तीचे भंबेरी उडाली.
मग काय वाहतूक पोलिसांनी डाव साधला आणि १० हजारांची पावती ( दंड) भरण्यास सांगितले. ती तरूणी म्हणाली की, १० हजार काही कमी नाही का? मग वाहतूक पोलिस म्हणाला ठिक आहे १००० रूपये कॅश द्या? तरूणी कडे कॅश नसल्याने तरूणीला समोरील किराणा मालाच्या व आईस्क्रीमच्या दुकानात जाऊन ५०० रूपये स्कॅन करून त्यांच्याकडून कॅश घेऊन या.
५०० रूपये कॅश करण्यासाठी दुकानदाराने २० रूपये जास्त घेतल्याने तरुणीने थेट एका वृत्तवाहिनीशी संपर्क साधून हकीकत सांगितल्याने सदरील प्रकार समोर आला आहे. दिवसभरात असा कित्येक रूपयांची बेनामी संपत्ती वाहतूक पोलिस जमा करत असतील?
तसेच किराणा दुकानदार तर यात सहभागी नाही ना?असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सातत्याने वाहतूक पोलिसांवर आरोप होत असताना कारवाई होताना दिसत नाही. पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी आहे का? नागरिकांना लुटण्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.