पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
एका पट्ट्याला जुगाराचा नाद ऐवळा लागला की, थेट घरफोड्याच करू लागला.जुगाराचे व्यसनापोटी सराईत घरफोडी करणा-या आरोपीस व चोरीचा माल घेणारे सोनारास अटक करुन लाखो रुपये किंमताचा ऐवज केला जप्त यातील फिर्यादी,वय ५८ वर्षे, रा. सोपानबाग सोसायटी, घोरपडी, पुणे यांचे बंगल्याचे नुतनी करणाचे काम चालु असताना मार्च २०२३ मध्ये त्याचे राहते घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन कपाटाचे डिजीटल लॉकर उघडुन त्यातील सोने, चांदी, हिरे चे दागीने व फॉरेन करन्सी असा एकुण ४० लाखांचा ऐवज चोरुन नेला म्हणुन वानवडी पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १४२/ २०२३ भा.द.वि. कलम ३८० अन्वये गुन्हा नोंद आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.वरिष्ठांचे आदेशान्वये दाखल गुन्हयाचा युनिट ५ गुन्हे शाखेकडुन तपास चालु असताना पुणे शहरातील १०० पेक्षा जास्त रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करणेत आली.तेव्हा युनिट कडील पथकास सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील घरफोडी करणारा गुन्हेगार मुकेश बबन मुने वय २६ वर्षे रा.स.नं.१११,दत्त मंदिराजवळ, सुतारदरा,कोथरुड पुणे हा मिळुन येत नसल्याने त्याचे बाबत अधिक माहीती घेता तो भिवंडी ठाणे येथे राहणेस गेल्याचे समजले.
त्याचा भिवंडी ठाणे येथे शोध घेतला असता तो व त्याचा मित्र नितीन सुरेश बागडे वय ३२ वर्षे रा. कवडे गल्ली, नालेगाव, अहमदनगर हे पुण्यातच असल्याचे समजले. त्यांचा शोध घेता.ते दोघे चंदननगर खराडी बायपास येथे मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन मुकेश मुने याने चोरलेले सोने हे नितीन बागडे याने त्याचे अहमदनगर येथील ओळखीचे सोनारांना विकल्याचे सांगीतले.
त्या दोघांना दाखल गुन्हयात अटक करुन अहमदनगर येथे जावुन तेथील सोनारा कडुन १) ४२ हजार रुपये मोत्याचे मणी व पुष्कराज खडे २)१६,००,०००/- रु कि.रु.चे ३२४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगडी व ३) ४,५०, ०००/-रुकि.ची फॉरेन करन्सी (डॉलर व पाऊंड) असा एकुण २०,लाख ९२ हजारचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.आरोपी मुकेश मुने यास ऑनलाईन बिंगो अॅपवर जुगार खेळण्याचा नाद असुन त्यामुळे त्याने घरफोडी चोरी करुन मिळालेले पैसे जुगारामध्ये हरलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दाखल गुन्हयाचा तपास कृष्णा बाबर, सहायक पोलीस निरीक्षक, युनिट ५ गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत. आरोपी मुकेश मुने हा घरफोडी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर ३५ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे,सहायक पोलीस आयुक्त,नारायण शिरगांवकर,यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम,सहा,पो.निरी.कृष्णा बाबर, अविनाश लोहोटे पोलीस अमंलदार, रमेश साबळे, प्रताप गायकवाड,विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, दयाराम शेगर, राहुल ढमढेरे, प्रमोद टिळेकर, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.