परिमंडळ अधिकारीच झाले अन्न व नागरी पुरवठा मंत्री.
दोन नंतर एंजट इन तर नागरिक आऊट?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील अन्न धान्य वितरण कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या परिमंडळ अधिकाऱ्यांना कुणाचीच भिस्त राहिलेली नसल्याचे दिसून आले आहे. नवनवीन नियम आणून नागरिकांना फक्त मानसिक त्रास दिला जात असताना वरिष्ठ मात्र चिडीचूप बसलेले आहेत. पुण्यातील सर्व परिमंडळ कार्यालयात दुपारी २ नंतर आलेल्या नागरिक व ज्येष्ठांकडून रेशनिंग कार्ड अर्ज स्विकारणे बंद करण्यात आले आहे. त्या हिटलरशाहीचा फटका नागरिकांना बसत आहे.
कामावरून आलेल्या महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून रेशनिंग कार्डाचे अर्ज घेण्यास नकार दिला जात आहे. उन्हात वनवन करून आलेल्या नागरिकांना २ नंतर अर्ज घेत व देत नसल्याने नागरिकांची दमछाक उडाली आहे. दुपारी २ नंतर अर्ज घेतले जाणार नाही सांगितले, जात असले तरी, असे कोणतेच शासन निर्णय नसल्याने आपआपल्या सोई प्रमाणे परिमंडळ अधिकारी कारभार करत आहेत.
शासन निर्णयच नसेल तर मग हे कोणाच्या आदेशाने अर्ज स्विकारणे बंद केले आहे? लांबून आलेले लोक गयावया करूनही परिमंडळ कार्यालयात “शेर बबर ” झालेले कर्मचारी नागरिकांनाच उलटसुलट बोलून पळ काढायला लावत आहेत. मात्र एंजटांची कामे २ नंतरही सुरू असल्याचे पाहिला मिळाल्याने, नागरिकांचा कल एंजटांकडेच वाढणार यात शंकाच नाही. अन्न धान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी परिमंडळ अधिकाऱ्यांनी घातलेला चुकीचा पायंडा तोडून नागरिकांच्या हिताचे आदेश पारित करण्याची व मनमर्जीपणा करणाऱ्या परिमंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
” दोन रूपयाचे फार्म २ नंतर मिळत नसल्याने नागरिकांना दोन तीनशेचा फटका? “
नागरिकांना माहिती नसल्याने परिमंडळ कार्यालयात दोन नंतर जाणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेला माहिती तर देण्यात आलीच नाही. परंतु एका नागरिकांने माहिती दिल्यानंतर नाव कमीचा अर्ज मागण्यात आल्यावर त्या ज्येष्ठ महिलेला उद्या सकाळी १० ते २ च्या आत येऊन घेऊन जा, सांगण्यात आले. महणजे फक्त फार्म घेण्यासाठी दोन तीनशे व दाखला घेण्यासाठी येण्यासाठी ( हेलपाटे) मारण्यासाठी दोन तीनशे रूपये खर्च करणे कितपत योग्य आहे. उंटावर बसून शेळया हाकणाऱ्या परिमंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.