अवैध वाळूचा ट्रक धरल्याप्रकरणी तलाठी- तहसिलदार यांच्या ड्रायव्हरला धक्काबुक्की, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
Spread the love

तलाठी राजेश दिवटे यांनी पोलिस ठाण्यात दिली तक्रार.

पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी, अवैधपणे वाळूचा ट्रक वाहतूक करताना त्यासाठी परवानगी आहे का अशी विचारणा केल्यावर तलाठी व तहसिलदार यांच्या ड्रायव्हरला सात आठ जणांकडून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी तलाठी राजेश दिवटे वय ३० वर्ष रा.मांजरी यांनी फिर्याद दिल्यानंतर सरकारी कामात अडथळा व इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हकीकत अशी की २४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून पुणे सोलापुर रोड शेवाळवाडी रुकारी पेट्रोल पंपा समोर दिवटे हे तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांनी वाळु कारवाईतील ट्रक १)ट्रक नं एम एच १२ सी टी ९९४२, २) )ट्रक नं एम एच १२ एफ झेड ३२४० हया दोन ट्रक पैकी ट्रक नं एम एच १२ सी टी ९९४२ हा तहसिल कार्यालय हवेली खडकमाळ या ठिकाणी घेऊन जात असताना गणेश ऑटोमोबाईल व रिपेअररींग सेंटर हडपसर समोर यातील ८ ते १० जणांनी कारवाईतील ट्रक हा अडवुन आमच्या गाडीला ट्रक घासला आहे.

असा बनाव करुन वाद घातला. फिर्यादी दिवटे यांच्या डाव्या पायावर दांडके मारुन तहसिलदार यांचे गाडीचा चालक राजु भिका कांबळे यांना शिवीगाळ धक्काबुक्की करण्यात आली आहे.

तसेच ट्रक नं एम एच १२ सी टी ९९४२ तसेच एम एच १२ एफ झेड ३२४० वरील चालक यानी सुर्योदयापुर्वी वाळु वाहतुक करुन परवाना नसताना वाळुची वाहतुक करुन ट्रक नं एम एच १२ सी टी ९९४२ ट्रक सह पळुन गेला आहे. व एम एच १२ एफ झेड ३२४० वरील चालक हा गाडी सोडुन पळुन गेला.

म्हणुन फिर्यादी दिवटे यांनी ट्रक चालक तसेच अनोळखी ८ ते १० जणांविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here