घोरपडे पेठेतील मुस्लिम दफनभूमीकडे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा कानाडोळा!

0
Spread the love

दफनभूमी मध्ये कबरी कमी कचराच जास्त.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलावर कचरा टाकून आंदोलन केले जाईल : लोकहित फाउंडेशन पुणे चा इशारा

पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी, पुणे शहरातील घोरपडे पेठेतील न्यू मोमीनपुरा मधील मुस्लिम दफनभूमीकडे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बर्याच दिवसांपासून दुर्लक्ष होताना दिसत आहे.

कब्रस्ताना साठी कोट्यवधी रुपये खर्चून देखील कचऱ्याचे साम्राज्य काही कमी व्हायला तयार नाही? दफनभूमी मधील स्वच्छतागृह दोन-तीन दिवस साफसफाई केले जात नाही तर कचरा कित्येक दिवसांपासून साचत असल्याचे पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींच्या निर्दशनास स्थानिक नागरिकांनी आणून दिले आहे.

सदरील दफनभूमीतील झाडे काढून व पालापाचोळा एका ठिकाणी ठेवला जात असल्याने कब्रस्तान मध्ये येणाऱ्या नागरिकांनी कचरा पाहून संताप व्यक्त केला आहे. सदरील ठिकाणी झाडूवाला दोन-दोन दिवस येत नसून आला तरी तो कचरा न उचला एका कोपऱ्यात किंवा साठलेल्या कचऱ्यात कचरा टाकून मोकळा होतो आहे.

तर औषध फवारणी करण्यासाठी देखील लवकर कोणी येत नसल्याचे बोलले जात आहे. वारंवार आरोग्य निरीक्षक व मुकदाम यांना संपर्क साधून स्वच्छते बाबतीत विचारणा केली असता आज उद्या म्हणत वेळ मारून नेत आहे.

आरोग्य निरीक्षक मुख्तार सय्यद हे कब्रस्तानात फिरकत देखील नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगत होते. तर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून दुजाभाव केला जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.

लवकरात लवकर दफनभूमी पुर्णपणे स्वच्छ आणि कचरा मुक्त न केल्यास तोच कचरा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकून आंदोलन केले जाईल असा इशारा लोकहित फाउंडेशन पुणे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here