रात्री उशिरापर्यंत चालू असणाऱ्या डिस्को पबला पोलीस आयुक्त लगाम घालणार का?

0
Spread the love

कोरोनाचे सर्व नियम बसवले जातेय धाब्यावर? नियमावली फक्त सामान्यांनाच का?

बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरू आहे रात्री २ वाजेपर्यंत पब.

पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी, पुणे शहरात अवैध धंदे चालू देणार नाही असे पुणे शहरात नियुक्ती झाल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मत व्यक्त केले होते. त्यानंतर ब-यापैकी अवैध धंदे बंद देखील झाले.

परंतु अवैध धंद्यांना लगाम घातला असला तरी बेकायदेशीरपणे चालणाऱ्या डिस्को पबला आवर घालणार कोण? पुणे शहरात अनेक ठिकाणी लाईट लाईफ सुरू असून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत पब चालत असल्याने स्थानिक नागरिकांना ते डोकेदुखी चे ठरत असताना पोलीस निरीक्षकांचे दुर्लक्ष होत आहे.

मध्यंतरी पोलीस आयुक्तांनी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध आणि बेकायदेशीर धंदे सुरू असतील त्या हद्दीतील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरण्यात येईल व आप आपल्या हद्दीत अवैध धंदे चालू नसल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे देखील आदेश काढले होते.

परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी कितपत झाली या बद्दल वरिष्ठ सांगू शकतात? बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज बहादुर मिल रोड येथील हॉटेल ग्रॅण्ड जवळ 2BHK पब रात्री उशिरापर्यंत चालू असताना कोणाच्या आशिर्वादाने सदरील 2BHK पब चालू आहे? काल रात्री २५ डिसेंबर रोजी रात्री २ वाजून गेले तरी पब चालू असल्याचे नागरिकांनी पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींनीच्या निर्दशनास आणून दिले आहे.

२४ डिसेंबर पासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजल्या पर्यंत शासनाने निर्बंध घातले आहे. परंतु त्या निर्बंधाची ऐशी तैशी की तैशी केली जात असताना पोलीसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याचे कालच्या पार्टीतून दिसून आले आहे.

सर्व सामान्यांसाठी मास्कची कारवाई करणा-या पुणे पोलिसांना विना मास्क व सोशल सोशल डिस्टंटचा फज्जा उडविला जात असताना दिसत नाही का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अधिक माहिती घेतली असता वसुलीवाल्यांची मेहरबानीने बेकायदेशीरपणे पब चालू असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात पुणे सिटी टाईम्स लवकरच उलगडा करणार आहे. क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here