पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
एकाच वेळी २ पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.हडपसर पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या मगरपट्टा पोलिस चौकीत एका महिलेला मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता.
आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर त्याची दखल घेत पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक व दोन महिला पोलिसांना निलंबित केले होते. त्यानंतर आज हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके यांची बदली करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या प्रकरणात लोणीकंद पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या वाघोली पोलिस चौकीसमोरच एका तरूणाने स्वतःला पेटवून घेतले होते.
त्यामुळे लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांची देखील उचलबांगडी करण्यात आली आहे.
अशी माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे.