पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक अतिक्रमण निरीक्षकास एक जणाने मारहाण केल्याने त्याच्या विरोधात
हडपसर पो.स्टे.२९०/ २०२४, भादविक ३५३,३३२, १८९, ३२३, ५०४, ५०६ भा.द.वि.सं.सह कलम ३, ५ सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंधक अधिनियम १९८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या संदर्भात अतिक्रमण सहायक निरीक्षक वय ३८ वर्ष रा. देहुगाव यांनी फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून ख्रिस्तोफर जॉन नाईक, वय २६ वर्षे, रा. गोपाळपट्टी, मांजरी, पुणे याला अटक करण्यात आली आहे.
१४ फेब्रुवारी २०२४ रोजी हडपसर क्षेत्रीय कार्यालय येथे सरकारी काम करीत असताना व कर्तव्यावर असताना यातील जॉन याने सावली फाउंडेशनच्या कॉर्नरला, हडपसर, पुणे येथील अनधिकृतपणे व रस्त्यावर अतिक्रमन केले.
त्यावर फिर्यादी यांनी गोरीला ग्लासच्या दुकानावर कारवाई केल्याच्या रागातुन व पुढे कारवाई करू नये म्हणुन फिर्यादी यांना हाताने मारहाण करून फिर्यादीचा शर्ट फाडून शिविगाळ करून ऑफिसमधल्या फाईली फेकुन देवून काच फोडून सरकारी कार्यालयाचे नुकसान करून पाहून घेण्याची धमकी देवून फिर्यादीचे सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.पो.निरी. डोंगरे करीत आहेत.