पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, वाढदिवस साजरा करण्यासाठी आज नव नवीन शक्कल तरूणाई लढवत असून ते वाढदिवस साजरा करण्यासाठी नव तरूण कोणत्याही थराला जाऊ शकतात यात काहीच शंका नाही.
पुण्यातील लोहियानगर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने केक कापून, त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करणा-या अल्पवयीन मुलीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. १४ फेब्रुवारी रोजी युनिट -१ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना, बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, लोहियानगर भागात पी.एम.सी कॉलनी नं ९ येथे वाढदिवसाचा केक कापण्यासाठी कोयता वापरला होता व तो हातात कोयता घेवुन डीजे लावुन नाचण्याचा व्हिडीओ काढुन तो सोशल मिडीयावर टाकण्यात आले आहे.
पुणे शहर पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी स्टाफसह लोहियानगर भागात पंचासह जावुन छापा घालुन सदर विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्याचे कडुन १ कोयता ५०० रूपये किमतीचा माल पंचा समक्ष जप्त केला आहे. त्याचेविरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे-१ गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख,महेश बामगुडे, तुषार माळवदकर,अय्याज दड्डीकर, यांनी केली आहे.