हम मंगळवार पेठ के भाई है, हमारे सामने कोई आया तो उसे भी काट देगें, म्हणत एकावर जिवघेणा हल्ला

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुण्यातील जुना बाजार येथे ताडपत्रीचा व्यवसाय करणाऱ्यावर जिव घेणा हल्ला करण्यात आला आहे. त्या बद्दल फरासखाना पोलिस ठाण्यात १९८/ २०२२ भादविक ३०७,३४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१ (३) १३५, क्रिमीनल लॉ अमेंन्डमेंट कलम ४,७ प्रमाणे दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमीर शेख,वय २३ वर्षे, रा.मंगळवार पेठ, यांनी फिर्याद दिली आहे.कोंबडी पुल, मंगळवार पेठ, येथे फिर्यादी हे ताडपत्री विकण्याचा व्यवसाय रोडवर करतात. दोनजण फिर्यादी यांचे दुकानाजवळ उभे होते. त्यावेळी फिर्यादी
यांना त्यांचे ओळखीचे गि-हाईक इसमाने त्यांना सदर इसमाकडे इशारा करून तुमचे ताडपत्री हे चोरून नेत आहेत असे सांगितले.

त्यानंतर फिर्यादी हे त्यांचे ताडपत्रीचे दुकान बंद करीत असताना, त्यांनी सदर इसमांचे जवळ येवुन, “माझे ताडपत्री तुम्ही चोरत आहात का?” असे विचारल्याचे कारणावरून त्याचा त्यांना राग येवुन, त्यांनी संगनमत करुन, लोखंडी रॉडने फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन, त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच“हम मंगळवार पेठ के भाई है, हमारे सामने कोई आया तो उसे भी काट देगें,आगे आकर देख लो असे म्हणुन,त्यांचे हातातील लोखंडी रॉड हवेमध्ये फिरवत सदर भागामध्ये दहशत निर्माण केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज अभंग करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here