पालिकेकडून फक्त नोटीसांचा प्रसाद.आंबेगाव मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या बांधकाम विभागाला येवलेवाडीत कारवाईचा पडला विसर?
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.
पुणे महानगर पालिका एकीकडे अनधिकृत बांधकामावर कारवाई करून आम्ही कोणाला घाबरत नसल्याचे दाखवून देत असली तरी, मात्र येवलेवाडी पानसरे नगर येथे अनेक कारखाने, झोपड्या वाढले असताना देखील पुणे महानगर पालिका बांधकाम खात्यातील अधिकारी फक्त आणि फक्त नोटीसा नोटीसा खेळत आहे.
येवलेवाडी पानसरे नगर सर्वे नं २४,२९,३० मध्ये शेकडो कारखाने अवैधरित्या निर्माण करून अनधिकृतपणे बांधकाम करून मोकळे झाले आहे. यापूर्वी देखील पुणे महानगर पालिकेने नोटीसा काढून देखाव्या पूर्ती कारवाई करून मोकळे झाले होते.
परंतु पुन्हा तक्रारी वाढल्याने फक्त नोटीसांचा प्रसाद दिला गेला आहे. तक्रार दारांच्या तक्रारी वाढले असताना देखील बंदोबस्त मिळत नाही? अधिकारी नाही? असे म्हणत टोलवाटोलवी करत आहेत.
सदरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून, कारवाई साठी झालेला पुणे महानगर पालिकेचा खर्च संबंधितांकडून वसुली करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.