झाडांची कत्तल करून जमीन सपाटीकरण.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढवा मध्ये बेकायदेशीर बांधकामांना ऊत आले असून ते बांधकाम थांबविण्यासाठी कोणी पुढे येत नाही. तर बेकायदेशीर बांधकाम करताना झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल केली जात असताना, अधिकारी आळीमिळी गुपचिळी, बसलेत?
कोंढवा मिठानगर लेन नं ९ चेतना गार्डन, मंदिरा शेजारी नव्याने बेकायदेशीर बांधकाम चालू होणार आहे. त्यासाठी काही लोकांना हताशी धरून बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांना उघडकीस आणून दिला आहे.
साधारणपणे १० ते १२ झाडांची कत्तल दिवसाढवळ्या करण्यात आली आहे. ह्या झाडांची कत्तल करताना मात्र पोलिस यंत्रणा, पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षातही कसे काय आले नाही. असा प्रश्न उपस्थित होते आहे. विना परवाना मोठ्या प्रमाणावर झाडे कापली जात आहे.
विनापरवाना झाडे कापणे हे कायद्याने गुन्हा असला तरी, अश्या बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कोणाचेच अंकुश राहिले नाही. पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करुन, संबंधित गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
लवकरच पोलिसात गुन्हा दाखल करणार.!
मिठानगर लेन नंबर ९ मध्ये झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु पोलिस दरबारी असा कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यावर आता लवकरच गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस दरबारी गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.