अधिकारी दररोज गायब होत असल्याच्या तक्रारी.
अर्ज घेतोय माथाडी कामगार. वरिष्ठ अधिकारी याची चौकशी करणार का❓
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुण्यातील रेशनिंग कार्यालयात दिवसेंदिवस भोंगळ कारभार सुरू असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. दररोज काही ना काही कामानिमित्त नागरिकांना रेशनिंग कार्यालयात जावेच लागते. परंतु अधिकारी कर्मचारी हे मस्तवाल झाल्या सारखे वागत आहेत. निगडी येथील रेशनिंग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी रोजच जाग्यावर नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. तर अधिकारी गायब असल्याने नागरिकांना चपला घासाव्या लागत आहेत.
निगडी येथील ज” परिमंडळ अधिकारी प्रदिप डंगारे हे वारंवार जाग्यावर नसल्या बाबतीत तक्रारी आल्याने, त्याचा जाब विचारण्यासाठी व पत्र देण्यासाठी समाजिक कार्यकर्ते अजहर अहमद खान हे रेशनिंग कार्यालयात गेले असता, प्रदिप डंगारे व त्यांचे हाताखालील कर्मचारी लाईट दिवे बंद करून गायब झाल्याचे दिसून आले.
म्हणजे कामाची वेळ संपण्यापूर्वीच सगळे गायब? मग पत्र घेणार कोण? यासाठी खान यांनी प्रदिप डंगारे यांना फोन लावला असता, डंगारे यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. डंगारे यांना सांगितले की, पत्र घ्यायला अधिकृत कर्मचारी कोणीच नाही. तेव्हा डंगारे खान यांना सांगितले की, माथाडी कामगार आहे त्याच्याकडे दया तो तुम्हाला सही शिक्का देईल.
परंतु माथाडी कामगारांकडून सही शिक्का घेणे हे अधिकृत आहे का? असा गंभीर प्रश्न अजहर अहमद खान यांनी उपस्थित केला आहे. मग माथाडी कामगारांकडूनच सगळे कामकाज करून घ्यायचे असेल तर मग डंगारे फुकटचा पगार घरी बसूनच का घेत नाही? अधिकारी जाग्यावर नसल्या बाबतीत अन्न धान्य वितरण अधिकारी ( अतिरिक्त कार्यभार) हे गंभीर दखल का घेत नाही? याबाबत स्वत जाऊन सहानिशा करणार का? असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला आहे. क्रमशः