गुन्हा दाखल होतोय परंतु रेशनिंग दुकानदार कुठेय? त्यांच्यावर कारवाई का होत नाही?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
पुणे शहरातील गोरगरिबांच्या पोटातील रेशनिंग धान्य काळ्या बाजारात जात असताना अन्न धान्य वितरण कार्यालय कुंभकर्णाची झोप घेत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.एकाच भागात तीन ते चार वेळा धान्य पोलिसांकडून धरपकड कारवाई केली जात असूनही पुणे अन्न धान्य वितरण कार्यालयातील फ्लाईंग स्कॉड व एफडीओतील यंत्रणेला गंज लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वीच भवानी पेठेतील काशेवाडी भागातील एका भंगार विक्रेत्यावर रेशनिंग धान्य काळया बाजारात विक्रीसाठी नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तर आता पर्यंत तीन ते चार वेळा कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
१) जावेद लालु शेख, वय – ३५ वर्षे, धंदा-मस्जीद मागे, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे भंगार खरेदी विक्री, रा. अंजुमन जवळा,२) अब्बास अब्दुल सरकावस, वय ३४ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. घर नं. ६५, अशोकनगर कॉलणी, काशेवाडी भवानी पेठ, पुणे,३) इम्रान अब्दुल शेख, वय ३० वर्षे, रा.आप्पा मोहीतेंच्या शेजारी, गोल्डन ज्युबली काशेवाडी, भवानी पेठ, पुणे असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. तिघांवर खडक पोलीस ठाण्यात ११८/२०२३ जिवनावश्यक वस्तु कायद क ३ (१)(२)(d)(e).७ (१)(a)(ii) अनयवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश प्रकाश जाधव,पोलीस शिपाई, बक्कल क्र. ९९०६, यांनी फिर्याद दिली आहे. ४० हजार ५०० रूपये किंमतीचा तांदळाने भरलेल्या ५४ पांढरे रंगाच्या नायलॉनच्या पिशव्या प्रत्येकी ५० किलो वजन एकुण २७,०० किलो धान्यावर नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी यांतीन आरोपी यांनी वेगवेगळ्या रेशनिंग दुकानदारांकडुन माल काळ्या बाजारात विकत घेवुन एकत्र करुन तो माल वाहतुक टेम्पो MH-12,PQ-0582 यामध्ये भरुन सदरचा माला मौजे केडगाव, ता. दौंड, जि. पुणे येथे बाजारात बेकायदेशिररित्या विक्रीकरीता घेवुन जात असतांना मिळुन आले. म्हणुन फिर्यादी यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरील कारवाई संगीता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संपतराव राऊत, पोलीस निरीक्षक गुन्हे, नितीनकुमार नाईक, सहा पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सहा पोलीस निरीक्षक,एच. एम. काळे सहा. पोलीस निरीक्षक खडक पोलीस ठाणे यांनी कामगिरी केली आहे. बऱ्याच वेळा जावेद लालू शेख याने रेशनिंग दुकानदारांकडुन धान्य उचलून काळ्या बाजारात चढत्या बाजार भावाने धान्य विकत असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. परंतु प्रत्येक वेळा जावेद शेख याच्यावर गुन्हे दाखल केले जातात परंतु रेशनिंग दुकानदार मोकळत असतात याचे मागचे गौडबंगाल काय आहे? हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. तर मोक्का दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.