पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील रविवार पेठेत एच.पी. सॅमसंग, कॅनन व इफसन, डिस्ने कंपनीचे बनावट पार्ट तयार करणारे रॅकेट पोलिसांनी उधवस्त केले आहे.फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाचे अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद , गुन्हे शाखा युनिट -१ यांनी ६ जुलै २०२३ रोजी आण्णासाहेब खैरेपथ शुक्रवार पेठ येथील प्रविण खोड , वय – २८ वर्ष , रा . कात्रज कोंढवा रोड , पुणे याचे दुकानात छापा टाकला.त्यादरम्यान त्याचे दुकानात सॅमसंग , कॅनन व इफसन कंपनीचे बनावट १ ) टोनर २ ) कार्टेज ३ ) आउटर बॉक्स ४ ) पॅक इंक बॉटल ५ ) होलोग्राम यांचे बनावटीकरण केलेले पार्ट व साहित्य मिळुन आले आहे.
गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने आरोपीताकडुन एकुण २५ लाख २४ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन खडक पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केलेला आहे . पुढील तपास गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस उपनिरीक्षक , कुलकर्णी हे करीत आहेत . तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद मिळुन १ ) तृप्ती ट्रेडर्स २ ) प्रेम टॉईज ३ ) गणेश ट्रेडर्स , रविवार पेठ , पुणे येथील दुकानांवर छापा टाकला असता , तिन्ही दुकानांतुन बनावट डिस्ने कंपनीची खेळणी व शाळेय साहित्य असा एकुण किंमत २ लाख ९ ३ हजार ९ ०० रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केलेला असुन , त्याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर , युनिट -१ , गुन्हे शाखा हे करीत आहेत.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, रितेश कुमार,सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक ,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे ,पोलीस उप – आयुक्त अमोल झेंडे ,सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे – १ , सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक , शब्बीर सैय्यद, सहा.पो निरी आशीष कवठेकर , पोलीस उप निरीक्षक , सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार , विठ्ठल पाटील , अमोल पवार , निलेश साबळे , अभिनव लडकत , शशीकात दरेकर यांनी केली आहे .