पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुण्यासारख्या सुरक्षित शहरात कायदा सुव्यवस्थाचे धिंडवडे उडाले आहे. रोज कुठे ना कुठे चोरी, खून, बलात्काराच्या घटना घडत आहेत. गुन्हेगारांना आता कायद्याचे धाक राहिलेले नाही. रोज गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पुणेकर दहशतीखाली जीवन जगत आहेत.
रात्री महिलांना बाहेर काढायचे म्हणटले की, आता पुणे शहरात भिती निर्माण झाली आहे. कधी कोण दारूडा राक्षस समोर येईल आणि कधी काय करेल याची भिती महिलांमध्ये पाहिला मिळत आहे.
बोपदेव घाटातील घटना ताजीच असताना पुण्यात रोज कुठे ना कुठे महिला व लहान मुलांवर अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे माहिती मिळत आहे. काल मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ३ वर्ष ८ महिन्याच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याने मुंढवा परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आरोपी विजय स्वामी बामु वय ३२ हा फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.