न्याती बिल्डरला १३ कोटी २७ लाखांचा दंड,आंबील ओड्यात अनधिकृत खनिज उत्खनन प्रकरण.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

पुण्यातील एका बांधकाम विकसकाने अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याचा प्रकार समोर आला आहे. नामांकित बांधकाम व्यवसायिक न्याती बिल्डर यांच्याकडून दांडेकर पूल येथील आंबील ओढा झोपडपट्टीत पुनर्वसन प्रकल्पाच्या ठिकाणी अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी १३ कोटी २७ लाख १९ हजार ७४ रुपयांचा दंडाची नोटीस काढण्यात आली आहे.

या प्रकरणाची सुनावणी १५ ऑक्टोबर २०२४ सकाळी होणार आहे.या प्रकरणी स्थानिक कार्यकर्ते प्रदीप भगवान अवघडे आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनी तक्रार केली आहे.

याबाबतचे सविस्तर हकीकत अशी दांडेकर पूल येथील आंबील ओढा झोपडपट्टी स. नं.१३५ फायनल प्लॉट २८ येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचे काम सुरू आहे. सदर काम प्रथम हे काम केदार असोसिएट यांच्या वतीने करण्यात येणार होते. मात्र सदर फर्म काळया यादीत गेल्याने पुन्हा ते काम केदार व्हेंचर त्यांना देण्यात आले.

स्थलांतरित केल्यानंतर केदार व्हेंचर त्यांनी नामांकित न्याती बिल्डर त्यांच्यासोबत विकासाचा ७० – ३० असा करार केला.या प्रकल्पात अनेक त्रुटी असून न्याती बिल्डर यांनी झोपडपट्टी वास्त्यांची घरे न बांधता विकण्यासाठीच्या बांधकाम सुरू केले. तसं त्यांनी जाहिरातही करण्यास सुरुवात केली. दरम्यान न्याती बिल्डर यांनी पाया खोदण्यासाठी २० मे २०२४ रोजी दहा हजार ब्रास खोदकामासाठी जिल्हाधिकारी कडून परवानगी घेतली.

त्यासाठी ६९ लाख ११ हजार १४५ रुपये जमा केले.मात्र त्यापेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिज उत्खनन करण्यात आले. याबाबत अवघडे यांनी आमदार धंगेकर यांच्या कडे तक्रार केली. त्यानुसार ९ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष जागेवर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १८२९३.४६३ ब्रास अधिक उत्खनन केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे न्याती बिल्डर यांना दंडाची नोटीस पाठविण्यात आली आहे. आता यावर काय आदेश होणार यावर लक्ष टिकून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here