पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी.
मुंबईतील सुप्रसिद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री ९.१५ च्या सुमारास ही घटना घडली.
निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाल्याचे बोललं जात आहे. यातील एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला.
या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथेच ते मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हे लिलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. तसेच मुंबईतील अजित पवार गटाचे नेते हे लिलावती रु्गणालयात दाखल होत आहेत.