अनधिकृत बांधकाम पूर्वत करण्यासाठी कोंढव्यातून एकही अर्ज पुणे महानगर पालिकेकडे आला नसल्याचे आले समोर !

0
Spread the love

निवासी झोन असताना देखील अनधिकृत बांधकामे करणारे बिल्डर का करत आहेत दुर्लक्ष?

अनधिकृत बांधकामे न करता गुंठेवारी अधिनियमानुसार परवानगी घेण्याचे कार्यकारी अभियंता राहुल सांळुखे यांचे आव्हान.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, “अजहर अहमद खान”

कोंढवा बुद्रुक पेक्षा कोंढवा खुर्द मध्ये बघता बघता आज हजारोंच्या संख्येने अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहे. तर एक दोन मजली इमारती उभ्या राहिल्या नव्हे तर तब्बल सात आठ मजली व त्या पेक्षाही जास्त उंच इमारती आज उभ्या राहिल्या आहेत.

उठसूट कोणीही आज बिल्डर होऊन किंवा आर्थिक गुंतवणूक करून लाखो रुपयांचे मालक झाले आहेत. काही वर्षांपासून गुंठेवारी होणार म्हणून पुणे महानगर पालिकेकडून सांगितले जात असताना आज अखेर गुंठेवारी अधिनियम २०२१ कायदा अस्तित्वात आला,

परंतु आज दोन महिने उलटले तरी अद्यापही कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक भागातून एकही बांधकाम गुंठेवारी नियमित करण्यासाठी अर्ज आला नसल्याची माहिती ” पुणे सिटी टाईम्सच्या ” हाती आली आहे.

अनधिकृत बांधकामे करणा-या बांधकाम व्यावसायिकांना शासनाचा महसूल बुढविणयाची सवई झाली आहे का? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. जेव्हा शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला नव्हता त्यावेळी बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ मोठ्या डिंगया मारल्या जात होत्या,

परंतु आता अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारी कायदा आणूनही कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरातून आजतागायत एकही अर्ज पुणे महानगर पालिकेकडे आला नसल्याचा खुलासा बांधकाम विकास विभाग झोन २ चे कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे यांनी पुणे सिटी टाईम्सला सांगितले आहे.

विशेष म्हणजे कोंढवा येथील क्वचितच भाग वगळता पुर्ण परिसर हा निवासी झोन आहे. असे असतानाही बांधकामे करताना पुणे महानगर पालिकेची परवानगी न घेताच सर्रास पणे अनधिकृत बांधकामे सुरू आहे.

यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याने कोंढव्यातील बांधकाम व्यावसायिकांनी पुणे महानगर पालिकेची परवानगी घेऊनच बांधकामे करण्याचे व गुंठेवारी कायदा अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे यांनी केले आहे.

……………….चौकट…………..

३१ डिसेंबर नंतर झालेल्या बांधकामांचे काय? नागरिकांनी फ्लॅट घ्याचं का नाही?

गुंठेवारी विकास नियमानुसार ३१ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत झालेल्या बांधकामांनाच परवानगी मिळणार आहे. परंतु ३१ डिसेंबर नंतर झालेल्या बांधकामांना परवानगी मिळणार नाही? म्हणजे ते बांधकामे अनधिकृत समजले जाईल? मग आज रोजी देखील अनेक ठिकाणी कोंढव्यात बांधकाम सुरू आहे मग नागरिकांनी त्या बांधकामात घरे घ्याचे का नाही? घेतलेल्या फ्लॅटवर कारवाई झाली तर याची जबाबदारी कोणाची? या सर्व बाबींचा नागरिकांनी विचार करूनच फ्लॅट,घरे खरेदी करावे असे पुणे सिटी टाईम्सकडून आव्हान केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here