हिंसा निर्माण होईल अशी अफवा पसरवून दोन समाजात तेढ आणि अल्पसंख्यांक समाजात दहशत निर्माण होईल गुन्हेगारी कृत्याची तक्रार.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, काल लता मंगेशकरांचा अंत्यसंस्कारावेळी शाहरूख खान याने मुस्लिम रिवाजाप्रमाणे दुवा पटन करून फुकांर मारून, दर्शनही घेतले होते. त्याबाबत सोशल मिडियावर शाहरुख खान बाबतीत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
त्या संदर्भात काही समाजकंटकांनी तर थेट जातीयवाद सुरू केला. तर दोन समाजात हिंसा निर्माण होईल अशी अफवा पसरवून आणि अल्पसंख्यांक समाजात दहशत निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य करण्यात येत आहे.
या संदर्भात चैतन्य सावळे यांनी पुण्यातील साबर सेलकडे ई-मेल द्वारे तक्रार केली आहे. चैतन्य सावळे यांनी तक्रारीत म्हटले आहे की भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यविधी मध्ये अनेक लोकांनी अंतिम दर्शन घेतले व आपापल्या पद्धतीने त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या, यात देशाचे मोठे प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान देखील होते ,
त्यांनी त्यांच्या धर्मा प्रमाणे परमेश्वराला दुआ प्रार्थना करून लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर हजारो लोकांसामक्ष फुंकर मारली आणि अभिवादन करून बाजूला जाऊन थांबले. पण काही लोकांनी “शांतुदुताना किती ही प्रेम द्या आदर द्या, प्रसिध्दी द्या,पणं ते शेवटी आपली लायकी दाखवतातच.. ह्या भो.. तिथे कोणी ही आमंत्रण दिले नव्हते किंवा तिथे आल्यावर हिंदुना काफिर समजून त्यांच्यावर थुंकलच पाहिजे हे त्यांना घरातून मशिदितून च शिकवलं जातं याचा जिवंत पुरावा,
तरही लोक वेळोवेळी आपली घाणेरडी मानसिकता दाखवत असतात आणि हिंदू नेहमी प्रमाणे कडी निंदा करून यांच्याकडे दुर्लक्षच करत आला आहे.
पण आता सुट्टी नाही ह्या भो…. आता त्याची खरी लायकी दाखवायला हवी.. इथुन पुढे याची कुठलीही जाहिरात असो किंवा मूव्ही आणि जमलं तर पूर्ण बॉलिवूड कायमचे #boycott करण्याची वेळ आली आहे.
सुशांत सिंग राजपूत पासून सुरू झालेला लढा हा आपल्याला शेवट पर्यंत टिकवून यांना कायमच बेरोजगार करायचं आहे.हिंदू आणि चुसलिम कधीच भाई भाई होऊ शकत नाही. हे जो पर्यंत अल्पसंख्याक आहेत तो पर्यंतच भाईचारा जपतात एकदा की त्यांची लोकसंख्या वाढली की ते कट्टर रूप धारण करून त्यांची खरी औकाद दाखवतात.यांना आता माफी नाही जो पर्यंत हा भो.. समोर येऊन माफी मागत नाही तो पर्यंत याच्यावर कुठलीही दयामाया दाखवायची नाही..!
अशा प्रकारची अफवा फेसबुक वर “Jaysingh Mohan” या अकाउंट द्वारे अपलोड करून इतर अनेक अकाउंट्स द्वारे शेअर आणि कॉपी करत पोस्ट केली,
अश्या पोस्ट मुळे अल्पसंख्यांक समाजाच्या बाबतीत बहुसंख्यांक समाजात द्वेष निर्माण होऊन पसरावा तसेच अल्पसंख्यांक समाजात दहशत तसेच बहुसंख्यांक समाजाच्या विधिमध्ये सहभागी होण्याबद्दल तसेच स्वतःच्या धर्मानुसार आचरण करण्याबद्दल भीती निर्माण व्हावी या साठी काही लोकांनी जाणूनबुजून असे संदेश सामाजिक माध्यमावर पसरवत त्यावरील प्रतिक्रियांमध्ये देखील अल्पसंख्यांक समजबाबत द्वेष निर्माण होईल अशा अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ केली आहे.
वरील सर्व प्रकार हा कट रचून नियोजनबद्ध पद्धतीने, यापूर्वी कोरोना काळात ज्या यंत्रणा वापरून अफवा पसरवल्या गेल्या त्याच यंत्रणान द्वारे केला गेला आहे, या बाबत अल्पसंख्यांक समाजात दहशत निर्माण होऊन भारतीय ऐक्याला अफवा पसरवून तडा गेल्या बद्दल चैतन्य सावळे यांनी तक्रार केली आहे,