येरवड्यातील अपघातानंतर कोंढव्यात अपघात होण्याची पुणे महानगर पालिका वाट पाहत आहे का?

0
Spread the love

येरवड्यातील अपघातानंतर कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांना आवारणार तरी कोण?

” पुणे सिटी टाईम्स ग्राउंड रिपोर्ट “

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, अजहर अहमद खान

पुण्यातील उपनगर भागातील कोंढवा ( Kondhwa) मध्ये आज रोजी राजरोसपणे शेकडो इमारतींचे अनधिकृत बांधकामे ( in legal construction) सुरू आहे. सदरील बांधकामांना परवानगी नसतानाही आज बिनधास्तपणे आठ- आठ दहा-दहा मजली उभ्या केल्या जात आहेत.

बांधकामे करताना सर्वच्या सर्व नियम सर्रास धाब्यावर बसविले जात असताना पुणे महानगर पालिकेतील ( pune pmc) अधिकारी मूग गिळून गप्प का बसले आहेत? या बद्दल नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही? बघता बघता तीन-सहा महिन्यात आठ-दहा मजली इमारत उभी करून नागरिकांना लागलीच सदरील फ्लाटचा ताबा ( पजेशन) दिला जात आहे.

पुणे महानगर पालिकेतील अधिकारी एकदा काही किरकोळ कारवाई करून मोकळे झाल्यानंतर सदरील ठिकाणी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात होते. कारण अनधिकृत बांधकामे करणा-यांना माहिती आहे की एकदा मनपाची यंत्रणा येऊन गेली की मग पुन्हा वर्षभर मनपा कारवाईला येत नसल्याने अनधिकृत बांधकामांचा सपाटाच सुरू झाला आहे.

पुणे शहरात किंवा महानगर पालिकेच्या हद्दीत एखादा अपघात झाला की शासकीय यंत्रणा कामाला लावून मृत्यूमुखी पडलेल्यांना रक्कम जाहिर करून मोकळे होतात. परंतु अनधिकृत बांधकामांना लगाम घालण्यासाठी महाविकास आघाडी व पुणे महानगर पालिका सपशेल फेल झाल्याचे दिसत आहे?

गेल्या ५ वर्षात कोंढवा मध्ये हजारो इमारती उभ्या राहिल्या आहेत. परंतु सदरील इमारतींचे बांधकाम चांगल्या दर्जाचे झाले आहे का? याची तपासणीच मनपाकडून केली गेलेली नाही? एकादी तक्रार आली की दुर्लक्ष करणारी महापालिका अपघात झाल्यावर खळबळून जागी होऊन कारवाईचा प्रपोगंडा करून मोकळे होतात.

आज कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक मध्ये जे इमारती उभ्या आहेत त्यातील हातावर मोजण्या इतकेच इमारतींना पुणे महानगर पालिकेची परवानगी आहे? अनधिकृत बांधकामांनमुळे सर्रास ड्रेनेज लाईन व पाण्याची व्यवस्था ढासळत चालली आहे? तर काही ठिकाणी रस्त्यावरच गटारीचे पाणी वाहताना कोंढवा वासियांच्या आरोग्याशी खेळ चालला आहे?

तर आज अनधिकृत बांधकामे करताना बिल्डरांकडून पार्किंगची ( parking) व्यवस्था नसल्याने रस्त्यावर वाहने पार्क केली जात असल्याने वाहतूक नियोजन देखील ढासळले आहे. त्यात विशेष म्हणजे अग्निशमन दलाच्या ( fire brigade) वाहनांना गल्ली बोळात जाण्यासाठी देखील रस्ते नाहीत,एखादी आगीची मोठ्ठी घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांना व अग्निशमन दलाच्या जवानांनी चांगलीच कसरत करावी लागेल यात शंकाच नाही?

कोंढवा वाहतूक जाम फोटो

काल येरवड्यात झालेल्या अपघातानंतर खळबळून जागी झालेली पुणे महानगर पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. परंतु कोंढव्यात सुरू असलेले अवैध गौण खनिज, अनधिकृत बांधकामे रोखण्यास सपशेल फेल झाली असून येरवडा सारखं अपघात कोंढव्यात होण्याची वाट पाहत आहे का?

तीन वर्षांपूर्वी कोंढव्यात भिंत कोसळून काही कामगारांचा मृत्यू झाला होता, तेव्हा काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले होते. तर त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जामिनासाठी पडापड करावी लागली होती. तर अधिकार व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने पुणे महानगर पालिकेच्या बाहेर आंदोलन देखील केले गेले होते,

तरीही आज तेच अधिकारी व कर्मचा-यांना अद्दल घडलेली नाही? आज कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करत आहेत. अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असेल तर कमीत कमी पुणे महानगर पालिका आयुक्तांनी तर यात विशेष लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here