कमी वयातील मुलीशी लग्न करने पतीला पडले भारी; पुणे महानगर पालिकेच्या डॉक्टरांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पती विरोधात बलात्कार, ( पोस्को) चा गुन्हा दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

कमी वयातील मुलीशी लग्न केल्याने पतीला चांगलेच भारी पडले आहे. पुणे महानगर पालिकेच्या डॉक्टरांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पती विरोधात बलात्कार,पोस्को चा गुन्हा दाखल झाल्याने कमी वयाच्या मुलींशी लग्न करणाऱ्यांना चांगलीच घबराट पसरली आहे. अल्पवयीन विवाहिता गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पतीवर कोंढवा पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२३ ते शनिवार ४ नोव्हेंबर २०२३ दरम्यान कोंढवा येथील शिवनेरी नगर येथे घडला आहे.याबाबत कमला नेहरू हॉस्पिटलमधील डॉक्टर उन्मेश रमेश अंभोरे वय- २९ रा. डॉक्टर्स रुम,कमला नेहरु हॉस्पिटल, मंगळवार पेठ, पुणे,यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात रविवारी ५ नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार आफताब आक्रबुद्दीन शेख वय-२२ रा. शिवनेरी नगर, कोंढवा याच्यावर आयपीसी ३७६/२/एन, पोक्सो कलम ४,६,८,१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब याचा जानेवारी २०२३ मध्ये विवाह झाला. विवाहाच्या वेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील त्याने तिच्यासोबत लग्न केले.लग्नानंतर आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

यातून ती ९ महिन्यांची गरोदर राहिली. दरम्यान, पीडित मुलगी कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आली असता तिच्या वयाची चौकशी करण्यात आली. त्यावेळी ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरांनी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुदळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here