३ लाख ५३ हजारांचा मुद्देमालासह पकडुन ठोकल्या बेड्या.
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
काळेपडळ पो.स्टे. गु.र.नं २८९/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५,३३१ (४) प्रमाणे गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्हयातील आरोपी याचा शोध घेणे कामी काळेपडळ पोलिस ठाण्याकडील तपास पथकातील पोलीस अंमलदार महादेव शिंदे व लक्ष्मण काळे हे हद्दीतील टायर चोरी झालेल्या ठिकाणी भेट देवून दाखल गुन्हयात चोरी करणारे अज्ञात चोरट्याची सीसीटीव्ही कॅमेरेची पडताळणी करून सदर सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपी याने गुन्हा करतेवेळी वापरलेल्या रिक्षाचे क्रमांकाचे व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येणा-या इसमाची ओळख पटवून त्यांस जैन टाऊनशीप येथून ताब्यात घेतले.
त्यांस त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने आपले नाव परवेझ लियाकत काझी, वय ४५ वर्षे रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर इसमाकडे अधिक तपास करता त्याने यापूर्वी उंड्री, महंदवाडी, हांडेवाडी तसेच लष्कर, गोकुळनगर परिसरातून पहाटेच्या वेळी कटावणीने टायर दुरुस्ती व विक्री करणारे दुकानाचे लॉक तोडून सदरच्या टायरच्या दुकानातील नवीन दुचाकी टायरची चोरी करत असल्याचे सांगितले आहे.
सदर आरोपीवर काळेपडळ पो.स्टे. येथे ०३, लष्कर व भारती विद्यापीठ येथे गुन्हा दाखल आहेत.आरोपी याचेकडुन एकुण ३ लाख ५३ हजार १७५ रूपये चे दुचाकी गाड्यांचे टायर हस्तगत करून वरील गुन्हे उघडकिस आणले आहे.आरोपी याने गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा व कटावनी हे त्याच्याकडून जप्त केले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन मानसिंग पाटील यांचे सुचनेप्रमाणे सहा. पो. निरी. अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने केली आहे.




