पुणे : कोंढव्यात वाढत्या बेकादेशीर बांधकामासंदर्भात पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर.

0
Spread the love

मेमनच्या बेकायदेशीर इमारतीच्या सर्व स्लॅबला पालिकेने मारले होल.

असे घरे खरेदी करू नये पालिकेने केले नागरिकांना आव्हान.

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

कोंढवा खुर्द मलीक नगर सर्वे नंबर ४६/१४/७/१ मध्ये मेमन नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने ४ मजली इमारत बेकायदेशीररीत्या उभी केली होती. त्यावर आज पुणे महानगर पालिकेने हातोडा चालवून पुर्ण इमारतीतील स्लॅबला होल मारण्यात आले आहे. सदरील कारवाई मोठी झाल्याने कोंढवा मध्ये बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सदर कारवाईच्या आदेशानुसार आज दि.३० जुलै २०२५ रोजी कारवाई करण्यात आली आहे.तर एकुण ३८०० स्केअर फुटावर कारवाई केली गेली आहे.

त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायकरित्या झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये.असे आवाहन पुणे महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here