उद्यान विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह?
फांद्या छाटण्याची घेतली परवानगी आणि मग अर्ध्यापेक्षा जास्त झाडच केले गायब.
कपड्याच्या दुकानाचा नाव दिसत नसल्याने कदाचित झाड हटविण्याचा प्रयत्न?
माजी नगरसेविकेच्या पतीच्या हट्टासापोटी झाडाची कत्तल ची परवानगी?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढव्यातील कौसरबाग सोसायटीकडून बेकायदेशीरपणे पत्र्याचे शेड उभारून दुकाने टाकली गेली आहेत. तर कित्येक वर्षे जुने असलेले हिरवी झुडपे असलेले भले मोठ्या झाडाची कत्तल करण्यात आल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. कौसरबाग सोसायटीने बेकायदेशीरपणे पत्र्याचे शेड उभारून तेथे दुकाने थाटली आहे. आणि दुकाने थाटून तेथे अडसर ठरत असलेल्या झाडाच्या फांद्या छाटण्याची परवानगी मागण्यात आली होती.
परंतु माजी नगरसेविकेच्या पतीच्या हट्टासापोटी उद्यान विभागातील अधिकाऱ्यांने थेट झाड कापण्याची परवानगी देऊन टाकली. तस पाहिले गेली की, तो वृक्ष काही किड लागलेला नव्हता, फक्त दुकानाला अडसर ठरत असल्याने रस्त्यावरील झाड कापण्यात आल्याने नागरिकांना नाराजी व्यक्त केली आहे.
काहींनी सांगितले की, कौसरबाग सोसायटीकडून बेकायदेशीरपणे पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. आणि दुकाने भाड्याने देण्यात आली आहे. दुकान ज्याला भाडयाने देण्यात आली तेथे कपड्याची दुकान चालू करण्यात आली आहे.
त्या दुकानाचे नाव दिसत नसल्यानेच सोसायटीकडून सदरील प्रकार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधिता विरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
” बेकायदेशीरपणे पत्र्याचे शेड आणि पुणे महानगर पालिकेची नोटीस “
कौसरबाग सोसायटीने बेकायदेशीरपणे पत्र्याचे शेड उभारून दुकाने भाडयाने देण्याचा प्रकार केला आहे. याला काहींनी विरोध केल्याने व नागरिकांना तक्रारीचा पाडा वाचल्याने पुणे महानगर पालिकेने दि. २१ जानेवारी २०२५ रोजी विजय पाटील, विजय दाभाडे यांनी नोटीस बजावली होती. परंतु नोटीस बजावून दीड महिना होत आला तरी कारवाई शुन्य आहे. पालिकेच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अधिक माहिती घेतली असता सुत्रांनी सांगितले की, येत्या २ दिवसात कारवाई केली जाणार आहे.