तातडीने काम थांबवा अन्यथा आम्ही पाडू, पुणे महानगर पालिका.
२४ तासांत बांधकाम काढून घेण्याची नोटीस, परंतु २४ तास उलटले तरी कारवाईच नाही?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करावे असे दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने सर्व महापालिकांना आदेश जारी केले आहेत. तरी सुद्धा आजही बेकायदेशीर बांधकाम पुणे मनपाच्या हद्दीत राजरोसपणे सुरू आहे.
सर्वे नं ४६/६ वडगाव शेरी, नगर रोडवर बोरा – गलांडे असोसिएटस कडून भले मोठे बेकायदेशीरपणे लोखंडी गल्डर टाकून काम जोमाने सुरू आहे. याबाबत लेखी तक्रार भाऊसाहेब ढोकणे यांनी पुणे महानगर पालिका बांधकाम विकास विभागाकडे केली होती.
विषेशता तक्रार प्राप्त झाल्यानंतर तातडीने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी समक्ष जाऊन पाहणी करून कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु असे झाले नाही. माध्यमांनी विषय लावून धरल्याने अखेर मनपाने २८ फेब्रुवारी २०२५ रोजी नोटीस काढत २४ तासांत सदरील लोखंडी बांधकाम काढून टाकण्याचे सांगितले.
परंतु २४ तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास उशीर केला आहे. एडवोकेट भाऊसाहेब ढोकणे यांनी सांगितले की पालिकेने नोटीस तर बजावली आहे परंतु नोटीस बजावून न सोडता तातडीने बेकायदेशीर बांधकाम काढून टाकण्यात यावे. आता पालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.
” बेकायदेशीर बांधकाम पालिकेने पाडल्यास संबंधितांकडूनच वसुली करावी. “
सदरील ठिकाणी भलेमोठे बेकायदेशीर बांधकाम करण्यात येत आहे. पालिकेने तातडीने बांधकाम काढून टाकावे आणि कारवाई करताना आलेला खर्च संबंधितांकडूनच वसुली करण्यात यावा.