पुण्यातील नाना पेठेत कोयता गॅंगचा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; ५ जणांविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुण्यातील नाना पेठेत कोयता गॅंगने नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ५ जणांविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेमंत पेरणे, पोलीस अंमलदार, समर्थ पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून १) गगनदीप अंमरीकसिंग मिशन, वय – १९ वर्ष, रा. ३०९, नानापेठ, २) अमन युसुफ खान,वय-२२ वर्ष,रा.१३ नानापेठ डोके तालीमच्या मागे,३) अरसलन हनीफ तांबोळी, वय – २७ वर्ष, रा. १०९०,

रविवार पेठ, ४) मंगेश कैलैस चव्हाण, वय-२४ वर्ष, रा.१०८९, रविवार पेठ,५) गणेश प्रकाश पवार, वय – २७ वर्ष,रा.१०८९ रविवार पेठ यांच्या विरोधात भाद विक १४३,१४७, १४८,१४९,५०४, ५०६(१),५०६(२), महा.पो.का. क.३७ (१)(३) १३५,आर्म अॅक्ट ४(२५),क्रिमीनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट क.३ व ७ नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

नाना पेठेत मोटार सायकलवर येवुन, त्यांचे हातातील कोयत्या सारखी प्राणघातक हत्यारे हवेत फिरवुन,त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवुन, दहशत निर्माण करुन,आरडा-ओरडा करत लोखंडी कोयते जोर-जोरात हवेत फिरवुन,तेथील नागरीकांमध्ये दहशत निर्माण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here