बिल्डींग बांधकामाच्या लोखंडी सेंट्रींग प्लेट चोरी करणारे टोळीचा भारती विद्यापीठ पोलीसांकडुन पर्दाफाश

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता यांना चोरीचे गुन्हयांतील आरोपींचा शोध घेणे आदेशीत केले होते.त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील सी.सी. टी.व्ही कॅमेरे व तांत्रिक विश्लेषण करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी,आशिष गायकवाड यांना

सदरचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस रेकॉर्डवरील विधी संघर्षीत बालकाने त्याचे साथीदारांचे मदतीने केला असल्याची माहीती मिळाली त्यांनी सदर विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने त्याचे साथीदार १) दत्ता धनाजी पाटोळे २) साहील दत्ता ढावरे व आणखीन दोन विधीसंघर्षीत बालक असे सर्वांनी मिळुन २० डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता चे सुमारास जांभुळवाडी रोड, लिपाणे वसती, ब्ली कोस्ट बिल्डींगचे पाठीमागील मोकळया जागेमधुन बिल्डींगचे कामकाजाच्या प्लेटा चोरी केल्या असल्याची कबुली दिल्याने, १) दत्ता धनाजी पाटोळे वय २० वर्षे, रा. तळजाई वसाहत, गल्ली नंवर ४४, पदमावती, २) साहील दत्ता ढावरे,वय १९ वर्षे,रा.तळजाई वसाहत म्हसोबा मंदीरजवळ,पदमावती, यांना गुन्हयामध्ये अटक करून त्यांचेकडुन गुन्हयातील चोरी केलेल्या १ लाख १० हजार रुपये किंमतीच्या एकुण १५० लोखंडी प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरची कारवाई स्मार्तना पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २,सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट,तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ,पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता,पोलीस अंमलदार मितेश चोरमोले,अभिनय चौधरी,अशिष गायकवाड,सचिन सरपाले,अवधुत जमदाडे,शैलेश साठे,चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे,हर्षल शिंदे,अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे,धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here