वसुली वाल्याच्या आशीर्वादाने सुरू आहे का सिस्टीमचा गोंगाट?
समाजिक सुरक्षा विभागाला आवाज ऐकू येते परंतु स्थानिक पोलिस ठाण्याचे वरिष्ठांना का ऐकू येत नाही?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
२८ डिसेंबर रोजी कल्याणी नगर, येरवडा परीसरात मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम सुरू असलेबाबत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांना माहिती मिळाली.झापा बार,हायलॅन्ड हॉटेल मध्ये मोठ्या आवाजात संगित सुरू असल्याचे आढळल्याने सदर हॉटेलवर कारवाई करून २ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सांउड सिस्टिम जप्त करण्यात आले असुन पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० चा नियम ५ चा भंग केलेबद्दल कारवाई करण्यात आली असुन जप्त मुद्देमाल येरवडा पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त,संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे (अति. कार्यभार) श्रीनिवास घाडगे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच अश्विनी पाटील,अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार आण्णा माने, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.