पुण्यातील वडगाव शेरी आनंद पार्क येथे कोयता, दगडाने मारहाणीचा थरारक, व्हिडिओ

0
Spread the love

महिला पोलिस कर्मचारी समोरच राडा.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील आनंद पार्कमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या हाणामारीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायलर झाला आहे. एका टोळीतील लोकांनी कोयत्याने आणि लाठ्या काठ्यांनी, दगडाने केलेल्या मारहाणीत २ ते ३ तरुण गंभीर जखमी झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओत या घटनेवेळी एक महिला पोलीस कर्मचारी एकटीच मारहाण करणाऱ्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

ही घटना वडगाव शेरीतील आनंद पार्क ते पवन सुपर मार्केटजवळील दिगंबर नगर दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे एकीकडे पुणे पोलिसांना कोयता गँगवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलेले असतानाच ही घटना घडली आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये खाकीचा धाक बसवण्यात पुणे पोलिसांनी मिळवलेल्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या घटनेत २ ते ३ तरुण जखमी झाले आहेत.

युट्युब व्हिडिओ }}}} पुण्यातील वडगाव शेरी मध्ये महिला पोलिस कर्मचारी समोरच तलवार, कोयते दगडाने हल्ला | व्हिडिओ व्हायरल


व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सुरुताली दोन तरुणांमध्ये वाद झाल्याचे दिसत आहे. त्यानतंर त्यांच्या वादाचे रुपांतर हाणामारीत होते आणि नतंर तिथे आणखी काही तरुण लाठ्या काठ्या घेऊन येतात आणि दोन ते तीन जणांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या वेळी तिथे उपस्थितीत असलेली एक महिला कर्मचारी त्यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र दहशत माजवणाऱ्या या तरुणांनी पोलिसांदेखत देखील राडा सुरूच ठेवला. यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here