काय म्हणताय राव.. थेट येरवडा जेलमध्येच खून, प्रचंड खळबळ

0
Spread the love

बाहेर खून केल्याने जेलमध्ये टाकले जाते परंतु जेलमध्येच खून होत असेल तर आरोंपीना टाकणार तरी कुठे?

पुणे सिटी टाईम्स : अजहर खान

पुणे शहरात दिवसाढवळ्या खुन, खुनाचे प्रयत्न करणाऱ्यांची येरवडा जेलची हवा खावी लागते, परंतु आता तेथेही दहशत माजवली जात असून थेट खूनच करून मुडदे पाडले जात आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. भरदिवसा झालेल्या या हत्येने खळबळ उडाली आहे. कात्री आणि दरवाजाच्या बिजागिरीने भोसकून खून करण्यात आला.

याप्रकरणी चौघा बंद्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.येरवडा कारागृहात भरदिवसा कैद्याची हत्या करण्यात आली आहे. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घटना घडली.हत्येच्या घटनेने येरवडा कारागृह हादरलं आहे.

महेश महादेव चंदनशिवे असं हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ४ कैद्यांनी महेशची हत्या केल्याची माहिती मिळत आहे. ४ आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस ठाणेमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैचीने आणि दरवाज्याच्या बिजागिरीने मानेवर वार करत कैद्याची निघृण हत्या करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here