महागड्या गाळ्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या विधीसंघर्षीत बालकांकडुन बॅटऱ्या जप्त; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

भारती विदयापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्या मुळे वरीष्ठांनी चोरीच्या गुन्हयांना आळा बसावा या करता तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता यांना पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हयांना आळा बसावा म्हणुन पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले,

अभिनय चौधरी व अशिष गायकवाड यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,आंबेगांव गायमुख परिसरामध्ये दोन लहान मुले ही त्यांचेकडे असलेल्या बॅटऱ्या रस्त्याने ये-जा करणाऱ्या मोटार सायकल स्वरांना विक्री करीत आहेत. मिळालेल्या बातमीचा खातरजमा करण्याकरीता तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे आंबेगांव गायमुख परिसरामध्ये गेले असता गायमुख चौकाचे मॅगो हॉटेलकडे जाणाऱ्या रोडवर दोन लहान मुले ही SF Sonic कंपनीची एक बॅटरी व NXTER RIOO कंपनीची एक व EXIDE XPRESS कंपनीची एक अशा तीन बॅटऱ्यांसह मिळुन आली.

त्यांचेकडे त्या बॅटऱ्यांबाबत तपास करता त्यांनी त्या बॅटऱ्या आंबेगाव व धनकवडी भागातुन चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडुन सदरच्या तीन बॅटऱ्या व एक दुचाकी गाडी असा एकुण ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नंबर ८११/२०२२ भादंवि कलम ३७९ व सहकारनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २४७/२०२२,भादंवि कलम ३७९ अन्वये दोन गुन्हा उघडकीस आले आहे.

सदरची कारवाई स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, सुषम चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ,पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी,अशिष गायकवाड,अमर भोसले,शैलेश साठे,रविंद्र चिप्पा, विश्वनाथ गोणे,हर्षल शिंदे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे,धनाजी धोत्रे,सचिन गाडे,सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, राहुल तांबे,विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here