अजहर खान यांनी केली होती तक्रार.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे कोंढवा बुद्रुक लक्ष्मीनगर मध्ये २ गुंठ्यात बेकायदेशीरपणे ६ मजली इमारतीचे काम चालू असल्याची तक्रार अजहर खान यांनी केली होती.
बांधकाम करताना अवैध गौण खनिज उत्खनन, तर सर्व नियम डावलून ६ मजली इमारत बेकायदेशीरपणे उभी राहिली. सदरील इमारत बेकायदेशीर उभी राहत असताना व ६ मजल्यापर्यंत काम होईपर्यंत पालिका प्रशासन झोपली होली का?
असा प्रश्न उपस्थित करत करत अजहर खान यांनी कारवाईचा तगादा लावला होता. अखेर पालिकेने आरिफ इनामदार व वाहिद इनामदार यांच्या ६ मजली बेकायदेशीर इमारतीवर पालिकेने हातोडा चालवला आहे.
तर पालिकेने सदरील बेकायदेशीर बांधकामावरील खर्च वसुल करावा यासाठी सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे. तर पालिकेने आव्हान केले आहे की, असे बेकायदेशीर बांधकाम करू नये व नागरिकांनी ते विकत घेऊ नये. असे बेकायदेशीर बांधकाम आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.