पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे शहरात काही खूनाच्या घटना काही कमी होयला तयार नाही, रोज कुठेना कुठे खून झाल्याचे ऐकायला मिळते. तक्रार केल्याचा व फोनवर शिवीगाळ केल्याच्या रागातून काही स्वताला हिंदूत्ववादी म्हणून मिरवणाऱ्यांनी एका कार्यकर्त्याचा मुडदा पाडला असल्याची माहिती मिळाली आहे.
आरपीआय चळवळीतील कार्यकर्ता बाळासाहेब रणदिवे याचा खून करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी रणदिवे यांनी काही हिंदूत्ववादी म्हणून मिरवणाऱ्याची तक्रार मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दिली होती.
त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा राग मनात धरून बाळासाहेब रणदिवे याचा काटा काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.