पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
“तू मला खूप आवडेतस, माझ्यासोबत एकटी बंद केबीनमध्ये चल, सिंहगड क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य
निरक्षकाचा प्रताप समोर आला आहे. पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाने असा प्रकार केल्याचे समोर आल्याने क्षेत्रीय कार्यालयात खळबळ उडाली आहे.
त्याने एका महिलेला “तू मला खूप आवडेतस, माझ्यासोबत एकटी बंद केबीनमध्ये चल, आपण वैयक्तिक बोलू” असे म्हणून विनयभंग केला आहे.
एका ३० वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत गणपत लाड वय ५५, रा. साईआनंद पार्क, ज्ञानदीप कॉलनी, कर्वेनगर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभाग कक्षात मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजता घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आरोग्य कक्षात असताना चंद्रकांत लाड त्यांच्याजवळ आला व त्याने फिर्यादींना “मी तुझ्या सोबत बोलतो, तु मला खूप आवडते. माझ्या सोबत एकटीच बंद केबीनमध्ये चल. आपण वैयक्तिक बोलू” असे बोलला. फिर्यादी यांनी त्याला नकार दिल्यावर परत त्याने
फिर्यादीस “मी तुला नोकरीत सवलत देतो, तुला वेळोवेळी सुट्ट्या देतो, त्यामुळे माझे तू एक काम कर माझ्यासोबत केबीनमध्ये चल,” असे म्हणून फिर्यादीचा विनयभंग केला. सिंहगड रोड पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय तपास करीत आहेत.