पुण्यातील धक्कादायक घटना; एका तरुणीवर ३ जणांनी केला बलात्कार, उडाली खळबळ.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

पुण्या सारख्या सुशिक्षित शहरात आज खून, बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत. रोज कुठेना कुठे बलात्काराच्या घटना ऐकायला व पाहायला मिळत आहे. कालचीच वानवडी परिसरातील घटना ताजी असतानाच रात्री ११ वाजता एका तरुणीवर ३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नुकतेच दोन दिवसांपूर्वीच बोपदेव घाटात मित्रांसोबत फिरावयास गेलेल्या एका तरुणीचे कारमधून एका तरुणाने अपहरण केले होते. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग करून आरोपी तरुणीला सोडून पळून गेला होता त्यानंतर आता पुन्हा बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.

संबंधित पीडित मुलगी ही मूळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथील राहणार आहे. सदर दोघे पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत.

गुरुवारी रात्री सदर दोघे दुचाकी वर बोपदेव घाट या ठिकाणी फिरावयास गेले होते. त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आल्या त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. सदर जागा ही एकांत ठिकाणी असल्याने कोणतीही मदत पीडित मुलीस मिळू शकली नाही.

या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेले पीडित मुलीस तिच्या मित्राने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला.

याबाबतची माहिती कोंढवा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी येऊन घडलेल्या घटनेची माहिती घेत आज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.तर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here