पुणे : पार्थ पवार नावावरील जमीन खरेदी प्रकरणात निलंबित झालेल्या सहाय्यक दुय्यम निबंधकावर फौजदारी कारवाई!

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पार्थ पवार नावावरील जमीन खरेदी प्रकरणात आज दुपारी निलंबित झालेल्या सहाय्यक दुय्यम निबंधकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

तब्बल १८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

या वादग्रस्त व्यवहारात मोठ्या अनियमिततेचा संशय व्यक्त करण्यात येत असून, विशेष म्हणजे या व्यवहारासाठी फक्त ५०० रुपयांचीच स्टँप ड्युटी आकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

त्याअनुषंगाने पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यानंतर दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांनाही निलंबन करण्यात आले. या दोघांवर जमीन नोंदणी प्रक्रियेत गंभीर अनियमितता व बेकायदेशीर नोंदणीचा ठपका ठेवण्यात आला आहे.

निबंधक हवेली क्र.४ पुणे येथील नोंदणी झालेला दस्त क्र. ९०१८/२०२५ बाबतच्या दस्त नोंदणी कार्यवाहीमध्ये गंभीर अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सदर दस्तातील पक्षकारांनी शासनाची फसवणूक करुन दस्तनोंदणी केल्याचे सकृतवर्शनी दिसून आले आहे,

यामध्ये शासनाची नजराणा व मुद्रांक शुल्काची आर्थिक फसवणूक केल्याचेही दिसुन येत आहे.तरी याबाबत दरतातील लिहून देणार यांचे कुलमुखत्यारधारक श्रीमती शितल तेजवाणी आणि लिहून घेणार ऑमेडीया एंटरप्राइजेस एल एल पी तर्फे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांचेविरुध्द तसेच यामधये संगनमताने साथ दिल्याबाबत संधित दुयम निबंधक रविंद्र तारु यांचेवर फौजदारी कारवाई करण्याकरिता उदयराज चव्हाण नोंदणी उपमहानिरीक्षक ( मुख्यालय) पुणे यांनी आदेश काढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here