पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पोलिस दलातील १० पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदली करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे शहरातील पोलिस दलात बदल झाले आहेत. अंलकार पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेला नवीन पीआय ( PI) मिळाले आहेत. तर, आर्थिक गुन्हे शाखेत नवीन अधिकारी आले आहेत.पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखा युनिट ६ मध्ये कार्यरत असलेले रजनीश निर्मल यांची आर्थिक गुन्हे शाखा येथे बदली करण्यात आली आहे.
तर, वाहतूक शाखेतील उल्हास कदम यांची गुन्हे शाखा युनिट ६ तर, विक्रम गौड यांची शिवाजी नगर पोलिस ठाणे गुन्हे शाखेतून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.कोंढवा पोलिस ठाणेमध्ये गुन्हे शाखेत कार्यरत असलेले संजय मोगले यांची ते वाहतूक शाखेत तर, नियंत्रण कक्षातील रवींद्र कदम यांची गुन्हे शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.
स्वारेगट पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेतील सोमनाथ जाधव यांची गुन्हे शाखा, युनिट ४ मध्ये तर, अलंकार पोलिस ठाण्यातील गुन्हे विभागातील संगीता पाटील यांची गुन्हे शाखा स्वारगेट पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा युनिट ४ मधील गणेश माने यांची आर्थिक गुन्हे शाखा, मानसिंग पाटील यांची खडकी पोलिस ठाण्यातून गुन्हे, कोंढवा पोलिस ठाणे तर, सुरेखा चव्हाण यांची नियंत्रण कक्षातून अंलकार पोलिस ठाणे गुन्हे विभागात बदली करण्यात आली आहे.




