एक तरुण जखमी झाल्याची चर्चा.
पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी,
सध्या पुणे शहरात क्राईम दिवसेंदिवस वाढत असल्याने पुणेकरांनी चिंता व्यक्त केली आहे. पुण्यातील गजबजलेल्या भागात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.
कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट भागात एका तरूणाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे.या घटनेत तौफिक अख्तर शेख वय-४५ रा. भीमपुरा कॅम्प, पुणे हे जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर जुल्फिकार शेख नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.