कोंढव्यातील फक्त १८ इमारतींनाच फायर एन.ओ.सी.!धक्कादायक माहिती आली समोर.

0
Spread the love

सर्वाधिक कोंढवा बुद्रुक मधील इमारतींना फायर एन.ओ.सी.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान.

पुणे शहरातील उपनगर भागातील दाट लोकसंख्या असलेल्या कोंढवा ( KONDWA) मध्ये फक्त १८ इमारतींनाच फायर ब्रिगेडची एन.ओ.सी ( FIRE NOC) असल्याची धक्कादायक माहिती, माहिती अधिकारात उघडकीस आली आहे.

कोंढव्यातील बांधकाम व्यावसायिकांकडून नागरिकांचे जीव धोक्यात घालून फायर सिस्टीम (FIRE SISTIM) बसविण्यास हलगर्जीपणा केला जात आहे.

कोंढवा मध्ये गल्ली बोळात मोठ मोठ्या इमारती अनधिकृतपणे उभ्या राहिल्या आहेत. परंतु एकादी मोठ्ठी दुर्घटना घडली तर तिथं पर्यंत फायर ब्रिगेड ( FIRE BRIGADE ) वाहन जाण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने जाणार कुठून? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

“संग्रहित फोटो “

बांधकाम व्यावसायिक स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी कोंढवाकरांचे जीव टांगणीला लागवले आहे. फायर सिस्टीम बसविण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत असल्याने ते पैसे बांधकाम व्यावसायिकांकडून वाचवले जात आहे.

पुर्ण कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक मध्ये फक्त आणि फक्त १८ एन.ओ.सी फायर ब्रिगेड विभागाने दिल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. अनधिकृत बांधकामे करताना पुणे महानगर पालिका दुर्लक्ष करत आली असली तरी आता फायर सिस्टीम न बसविता नागरिकांचे जीव धोक्यात घालणा-यांविरोधात कडक पावले उचलणार का? का फक्त अपघात होण्याची वाट पाहतं बसणार? असा प्रश्न कोंढवाकरांनी विचाराला आहे.

अनधिकृत बांधकामांमध्ये जर फायर डिस्ट्रगयूशर, फायर सिस्टीम बसविण्यात बांधकाम व्यावसायिक हलगर्जीपणा करत असेल तर पुणे लोहियानगर गंज पेठ येथील मुख्य फायर ब्रिगेड कार्यालयात नागरिकांनी तक्रारी करण्याचे आवाहन पुणे सिटी टाईम्सने केले आहे.

………….कोंढवा खुर्द-………

१) सर्वे नंबर ६२/१/२/१,६२/१/२/२ कोंढवा बुद्रुक.
२) सर्वे नंबर ५८/२/३/१०, ५८/५/२/२५ कोंढवा बुद्रुक.
३) सर्वे नंबर ६३/२ कोंढवा बुद्रुक.
४) सर्वे नंबर १७/२ कोंढवा बुद्रुक.
५) सर्वे नंबर ५०/२/१/३ कोंढवा बुद्रुक.
६) सर्वे नंबर ६६/५ कोंढवा बुद्रुक.
७) सर्वे नंबर ५६ कोंढवा बुद्रुक.
८) सर्वे नंबर ४ हिस्सा नंबर १/४ कोंढवा बुद्रुक.
९) सर्वे नंबर ५९/२/५१, ५९/२/५२,५९/२/५३, ५९/२/६९, ५९/२/८२, ५९/२/८३ कोंढवा बुद्रुक.
१०) सर्वे नंबर ५८ हिस्सा नंबर ३ कोंढवा बुद्रुक.
११) सर्वे नंबर २ कोंढवा बुद्रुक.

……………….कोंढवा खुर्द…………..

१२) सर्वे नंबर २७/१/१७,२७/१/१९,
१३) सर्वे नंबर जुने, ४३/१/ २अ, ४४/२/२, ४४/२/३/२/१, ४४/२/३/३, ४४/२/३/२/६, व इतर
१४) सिटीएस नंबर ४८४, सर्वे नंबर २६ प्लॉट नं ३८
१५) सर्वे नंबर ४६ हिस्सा नंबर ४६/८, ४६/१५/१, ६२/४.
१६ ) सर्वे नंबर ५१ हिस्सा नंबर २अ, २अ/३२, २अ/३२/१,
१७) सर्वे नंबर ४४/१/२/६,
१८) सर्वे नंबर १६अ/४/२/१,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here