पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
आज दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीनुसार आंबेगाव, पुणे येथील सार्वजनिक रोडवर, इसम देविलाल शंकरलाल आहीर, वय ४२ वर्ष रा. कात्रज, पुणे
यांच्या ताब्यातुन एकुण ५६ लाख ९० हजारांचा २ किलो ८४५ ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ तसेच माल लपविण्याकरीता वापरलेली अॅक्टीव्हा गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे,पोलीस उप- आयुक्त, गुन्हे,निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २,राजेंद्र मुळीक यांचे
मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, उदय राक्षे,दिशा खेवलकर, संदिप शेळके,नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.