सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कोंढव्यातील कमेला येथील ६ जणांना पोलिसांनी केली अटक

0
Spread the love

भारतीय दंड विधान कलम ३५३,१४३, १४७,१४९,५०६ नुसार गुन्हा दाखल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

नोटिस बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कोंढव्यातील कमेला येथील ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. राहूल रासगे पोलीस अंमलदार कोंढवा पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे.

त्या फिर्यादीवरून,१) सिराज जैनुदीन शेख वय ६९ वर्ष, रा. ४/१२, साळुंखे विहार रोड कमेला कोंढवा, २) अकबर अमीर कुरेशी वय ४२ वर्ष, रा. ११०५, कमेला एसआरए, कमेला कोंढवा खुर्द, ३) अफसाना अकबर कुरेशी वय ३४वर्ष, रा. सदर ४) फातीमा सिराज शेख वय ५९ वर्ष, रा. ४/१२,साळुंखे विहार रोड कमेला कोंढवा, ५) इरुफाना कादर कुरेशी वय ४० वर्ष,६) नजराना फयाज बेपारी वय ३६ वर्ष अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

काल दि. २७ रोजी स.नं. ४/अ/१/३/१० अ११ सिटीएस नं. ३९३,४३९ कमेला सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत, कोंढवा खुर्द,येथे फिर्यादी रासगे हे कोंढवा पोलीस ठाण्याकडील दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सी.आर.पी.सी. कलम ४१(१)(अ) अन्वये वरील आरोपींना नोटीस अदा करण्याकरीता गेले असताना, नमुद इसमांनी फिर्यादी यांना यामध्ये पोलीसांचा काही संबंध नाही ही घरे आमची आहेत. आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे.

आम्ही येथून बाहेर पडणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा.आम्ही या नोटीसवर सह्या करणार नाही असे म्हणून फिर्यादीस धक्काबुक्की करून फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश तोरगल करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here