वानवडी वाहतूक पोलिसांचा पावत्या फाडण्यावर जास्त भर, कारवाईची मागणी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरात वाहतूकीचे तीनतेरा वाजले असताना वानवडी वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत करायची सोडून पावत्या फाडण्यावर जास्त भर देत आहे. विषेश म्हणजे वाहतूक सुरळीत न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईच होताना दिसत नाही. रामटेकडी ब्रिज ते बी.टी.कवडे रोड वरील “९३ एवेन्यू मॉल” पर्यंत होणारी रोजचीच वाहतूक कोंडीतून कसेबसे वाहन बाहेर काढून मोकळा श्वास घेत असतानाच ९३ एवेन्यू मॉलच्या सिग्नलच्या दोन्ही बाजूला प्रमाणिक पणे पावत्या फाडणारे वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत न करता चिरीमिरी घेऊन वाहने सोडून देत असल्याचे दिसून आले आहे.
तर थोड पुढे आले असता भैरोबानाला पोलिस चौकी येथे दबा धरून बसलेले वाहतूक पोलिस सावज शोधून नागरिकांकडून आवाजावी रक्कम गोळा करताना दिसलेत. तर त्याच्या पुढे म्हणजे जुना पुलगेट ते गोळीबार मैदान पर्यंत रोजचीच होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याचे सोडून सिग्नलवर आणि सिग्नल पासून शंभर मीटर लांब थांबून पावत्या फाडण्यावर जास्तच भर दिले जात असल्याचे पुणे सिटी टाईम्सच्या निदर्शनास नागरिकांनी आणून दिले आहे.
आज पुणे शहरात वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली असताना, पोलिस मात्र वसुलीवर जास्त भर देऊन मलाई खाऊन नागरिकांच्या खिशावर एकप्रकारे दरोडाच घालत आहे? वरिष्ठ अधिकारी अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करत असले तरी आजरोजी त्या दरोडा घालणाऱ्यांना काहीच फरक पडत नसल्याचे जाणवत आहे? तर वानवडी वाहतूक पोलिस निरीक्षक या सगळ्या गोष्टी संदर्भात फक्त बघ्याची भुमिका घेत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
तर अधिक माहिती घेतली असता वानवडी वाहतूक विभागातील वसुली बहाद्दार संजय तावरे मात्र आलबेल असल्याचे दिसून आले आहे. अवैध रिक्षांवर कारवाई न करता तावरे महाशय महिन्याला लाखो रूपयांची वसुली करून अवैध रिक्षा वाहतूक करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत.
आज रस्त्यावर विना परवाना, पासिंग नसलेली व क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने रिक्षा वानवडी वाहतूक विभागाच्या हद्दीतून वाहत असताना संजय तावरे यांना अभय देत आहे. याबाबत निरीक्षकांना माहिती असताना देखील आळी मुळे गुपचिडी सारखे सगळेच वागत आहेत.
अशा वसुली बहाद्दारांवर कारवाईची मागणी होत असल्याने वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ विजयकुमार मगर हे निलंबनाचे अस्त्र बाहेर काढून कारवाई करणार का?
अशी मागणी पुणेकरांकडून होत आहे. आता वाहतूक पोलिस उपायुक्त काय कारवाई करणार याकडे लक्ष वेधून राहणार आहे. क्रमक्षा: