कोंढवा ‌: बेकायदेशीर होर्डिंगकडे दुर्लक्ष करणं निरिक्षकाला भोवलं, निरिक्षकाची उचलबांगडी.!

0
Spread the love

कोंढव्यतात अनेक बेकायदेशीर होर्डिंग अन् लाखोंची मलाई?

पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी.

कोंढवा कौसरबाग, वेलकम चौक,कमेला , मेफेअर सोसायटी समोर,कापरे मळा व इतर ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंगचे जाळे तयार होत असतानाही पालिका झोपा काढत आहे का? या सदराखाली पुणे सिटी टाईम्सने बातमी प्रसिद्ध केली होती. तर आकाश चिन्ह परवाना उपायुक्त संतोष वारूले यांच्याकडे कारवाईचे मागणी केली होती. त्या वेळी वारूले यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश आकाश चिन्ह परवाना निरिक्षक मिलिंद पांगारे यांना दिले होते.

परंतु कारवाई करण्यासाठी मिलिंद पांगारे टाळाटाळ करत होते. पुन्हा बातमी प्रसिद्ध करताच रात्री उशिरा फक्त दाखवण्यासाठी मिलींद पांगारे यांनी ३ ते ४ होर्डिंगवर कारवाई केली.

परंतु कारवाई केलेला लोखंडी सांगाडा कुठंय व कारवाईचा खर्च किती वसुल करण्यात आला.याची वारंवार माहिती मिलिंद पांगारे यांना मागून देखील टाळाटाळ होत होती. तर विषेश म्हणजे आज त्याठिकाणी पुन्हा होर्डिंग उभे राहिले असून बेकायदेशीररित्या जाहिरात देखील चालू आहे.

मागील बातमी }}  पुणे : कोंढव्यात अनधिकृत होर्डिंगचे साम्राज्य, परवाना निरिक्षकाकडून उपायुक्तांच्या आदेशाला थेट केराची टोपली.

 

याची तक्रार पुणे सिटी टाईम्सने आकाश चिन्ह परवाना उपायुक्त संतोष वारूले यांच्याकडे केली असता व इतर देखील तक्रारी असल्याने मिलिंद पांगारे यांची उचलबांगडी करून त्यांना मुख्य खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

निरिक्षकाची उचलबांगडी परंतु कारवाईचे काय?

मिलिंद पांगारे यांची तर उचलबांगडी करण्यात आली आहे. परंतु कारवाई नंतर चांगला सक्षम आकाश चिन्ह निरीक्षक नेमण्यात यावा. जेणेकरून बेकायदेशीर होर्डिगचे जाळे जळतील आणि महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला जाणार नाही.

 

फक्त बदलीने काय होणार? मिलिंद पांगारे यांची खातेनिहाय चौकशी होणार का? 

शासकीय कामकाज पार पाडताना हलगर्जीपणा करण्यात आल्याचे दिसून येते , आणि तसेच बेकायदेशीर होर्डिंगधारकांना अभय देऊन त्यांना बेकायदेशीररित्या जाहिरात करून देणे व शासकीय तिजोरीवर डल्ला मारण्यास मदत करणे? असे प्रकार केले असतानाही फक्त बदली हा जालीम उपाय नाहीये? तर खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here