काही दिवसांपूर्वी तीसऱ्या मजल्यावरून खाली पडलेल्या पुणे शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये निधन.

0
Spread the love

 

फरासखाना सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून होते कार्यरत.

पुणे सिटी टाईम्स ( PCT ONLINE) प्रतिनिधी.

फरासखाना सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले अशोक धुमाळ यांचे निधन झाल्याने पोलिसांनी धसकाच घेतला आहे. काही दिवसापूर्वी अशोक धुमाळ हे ते राहत असलेल्या आंबेगाव येथील इमारतीवरून खाली पडल्याने त्यांना चांगलाच मार लागल्याने त्यांना भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. ते काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.

घरी असताना त्यांची आज प्रकृती बिघडली. दुपारी उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांना आणण्यात आले होते. यावेळी प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते.

मागील बातमी }}}  खळबळजनक, फरासखाना पोलिस ठाण्यातील एक वरिष्ठ अधिकारी इमारतीवरून पडून जखमी. 

रात्री अशोक धुमाळ यांच्या शरीराने उपचारास प्रतिक्रिया देण्याचे बंद केले होते. रात्री ९ ते ९.३० दरम्यान त्यांचे निधन झाले. अशोक धुमाळ यांच्या निधनाची बातमी समजताच पुणे शहर पोलीस दलातील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुबी हॉस्पिटल येथे धाव घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here