मालपानी ग्रुप,विमाननगर, एअरपोर्ट रोडवरील प्रकार.
पुणे सिटी टाईम्स (PCT ONLINE) प्रतिनिधी.
माथाडी कामावरून खंडणी,मारहाणीचे येरवडा पोलिस ठाण्यात एकमेकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एका नागरिकाने वय-३५ वर्षे, रा. स. न. ३०/२, रामवाडी नगररोड, फिर्याद दिल्याने ९ जणांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात ४४/२०२४, भादविक ३०७,३८५, ३२४,५०४,५०६,१४३,१४७,१४८, महा.पो.का. क.३७ (१)१३५ गुन्हे दाखल करण्यात आला आहे.२७ जानेवारी २०२४ रोजी मालपानी ग्रुप, विमाननगर, एअरपोर्ट रोड, पुणे येथे यातील फिर्यादी त्यांचे कंपनीचा पार्टनर शेवराव यादव यास मालपाणी ग्रुपचे काम फिर्यादी यांचे कंपनीला मिळाल्याच्या रागातुन ते काम यात करायचे आहे अन्यथा काम करायचे नसेल तर पैसे/माथाडी दयावी लागेल असे बोलून, फिर्यादी यांना खंडणीची मागणी करुन,
फिर्यादी हे करीत असलेल्या कामाची ऑर्डर दाखवण्यासाठी दबाव टाकला, त्यास त्यांनी विरोध केल्याचा राग मनात धरून, याने त्याचे इतर साथीदार यांना बोलावून घेवुन यांनी माझ्या धंद्यावर पाय आणले आहेत आज यांना जिवंत सोडत नाही असे म्हणुन लोखंडी रॉडने फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोक्यात मारुन, त्यांना गंभीर जखमी करून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांचे उजव्या हाताला मार लागला आहे. तसेच इतरांनी दगडाने तसेच हाताने मारहाण करुन शिवीगाळ करून, फिर्यादी व शेवराव यादव यास जखमी करुन पुन्हा मारण्याची धमकी दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक दत्तत्रय नांगरे करीत आहेत.
तर सनी ढिल्लोड, वय-३२ वर्षे, रा. सिध्दार्थनगर, रामवाडी, यांनी फिर्याद दिल्याने दुसऱ्या लोकांवर येरवडा पोलिस ठाण्यात ४५/ २०२४, भादविक ३०७,३२६,३२४,३३७, ३२३,५०४, ५०६, ४२७,३४ यातील फिर्यादी हे त्यांचे सोबत विकास चव्हाण, रवीशिंदे, सुशील चव्हाण यांचेसह बिल्डरच्या साईटवर लोडिंग / अनलोडिंगचे कामासाठी विचारणा करण्यासाठी गेले असता, त्याठिकाणी यातील नमुद इसमांनी तु कोण आम्हाला विचारणारा, तु काय इथला भाई आहे का असे बोलुन, फिर्यादीस शिवीगाळ करून, माझ्या धंदयाच्या आड येतो का, आता मी तुला जिवंत सोडत नाही असे म्हणुन
फिर्यादीस धक्का देवुन, खाली पाडुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोक्यात दगड घालत असताना, त्यांनी हात मध्ये घातला असता त्यांचे उजव्या हाताला दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सदर इसमांनी फिर्यादी यांना थांब कुठे पळतो, आज तुला खल्लास करतो असे बोलून, फिर्यादी व त्यांचे सहकारी रवी शिंदे, गणेश ढिल्लोड यांना हाताने मारहाण व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी यांचे कारवर दगडाने मारुन नुकसान केले आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड करित आहेत.