पुणे शहरातील वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची बदली, शशिकांत बोराटे नविन पोलिस उपायुक्त

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT PCT) प्रतिनिधी.

लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभुमीवर कालच रात्री १५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तर आज १३ जानेवारी २०२३ रोजी शहरातील दोन पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची झोन ४,चे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर झोन ४,चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची वाहतूक शाखेत उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

शशिकांत बोराटे यांनी वाहतूक शाखेचा पदभार स्विकारल्याने त्यांच्या समोर आता पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याचे आव्हान असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here