पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
एका फिर्यादी यांची मुलगी हिचे बरोबर ऑन लाईन फ्रि फायर गेम मार्फत ऑन लाईन मैत्री करून सन २०२३ मध्ये फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हिला जिवे ठार मारील अशी धमकी देवून, तिचे न्यूड फोटो व्हाट्सअॅप व्दारे त्याला पाठविण्यास भाग पाडून त्याचेशी रिलेशनशिप मध्ये नाही राहिली तर ते फोटो तिच्या नातेवाईकांना पाठविल अशी वेळोवेळी धमकी देवून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे न्यूड फोटो पाठवले असल्याने आरोपी याचे विरूध्द मार्केट यार्ड पोलीस ठाणे येथे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ११,१२, भा.द.वि. कलम, ३५४,३५४ (ड), तसेच आय.टी. अॅक्ट ६६ (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल झालेवर गुन्हयातील आरोपीचे पुर्ण नाव व पत्ता माहित नसताना फक्त मोबाईल. क्र. तक्रारीत नमुद असल्याने मोबाईल क्रंमाक चे तांत्रिक विश्लेषण केल्यावर आरोपीचा बिहार मधील अपुर्ण पत्ता मिळून आला. परंतू त्या नंतर सतत मोबाईल. क्र. चे क्लिष्ट तांत्रीक विश्लेषण करून हरपुर, जि. बेगुसुराय, राज्य बिहार असे लोकेशन येत असल्याने तपासी अधिकारी स्वप्नाली शिंदे,पोलिस हवालदार किशोर पोटे, अमित जाधव, महिला पोलिस हवालदार धनश्री गोफणे असे तात्काळ बेगुसुराय बिहार येथे रवाना झाले. तेथे त्यांनी वेषांतर करून आरोपीची सर्व माहिती घेतली व त्यानंतर बिहार पोलीसांच्या मदतीने संवेदनशिल भागातून आरोपी अमनकुमार पंकज तांटी वय. २० वर्षे धंदा. शिक्षण रा. वॉर्ड नं. ११, हरपुर जि. बेगुसुराई, राज्य बिहार यास रिफायनरी ओ.पी. (बरौली थाना) यांचे मदतीने शिताफिने अटक करून गुन्हयात वापरलेला मोबाईल फोन हस्तगत केला.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग पुणे शहर रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त परि.५,आर. राजा, सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग शाहूराजे साळवे, मार्केट यार्ड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वप्नाली शिंदे, पोलीस अंमलदार किशोर पोटे, अमित जाधव, धनश्री गोफणे यांचे पथकाने केली आहे.